भाजप देणार १ लाख गायी; मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा
22 November 09:52

भाजप देणार १ लाख गायी; मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा

भाजप देणार १ लाख गायी; मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा फंडा

कृषिकिंग, हैदराबाद(तेलंगणा): तेलंगणा विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवनवे फंडे वापरले जात आहेत. भारतीय जनता पार्टीने सत्तेत आल्यास दरवर्षी १ लाख गायींचे वाटप करण्यात येईल, असे आश्वासन देण्याचे ठरवले आहे. भाजपाचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होणार आहे.

शेती, आरोग्य आणि ग्रामीण भागातील अर्थकारण गायीवर अवलंबून असते. भाजपा एक वेब पोर्टल तयार करणार असून, ज्यांना गाय हवी आहे, त्यांनी यावर नोंदणी केल्यास त्यांना गाय दिली जाईल. प्रत्येक जिल्ह्यासाठी साधारण ३ हजार गायी दिल्या जाणार आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीने (टीआरएस) ही २०१७ मध्ये अशी योजना आणली होती.संबंधित बातम्या