सातारा-सोलापुरात ओढे, नाले, बंधारे ओव्हर-फ्लो
20 November 10:45

सातारा-सोलापुरात ओढे, नाले, बंधारे ओव्हर-फ्लो


सातारा-सोलापुरात ओढे, नाले, बंधारे ओव्हर-फ्लो

कृषिकिंग, सातारा/सोलापूर: सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यात आज (मंगळवारी) सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. माण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस झाल्याने ओढे, नाले, बंधारे भरून वाहू लागले आहेत.

माण तालुक्याच्या पूर्व भागात सोमवारी हजेरी लावलेल्या पावसाने मंगळवारी पहाटेपासून पुन्हा जोरदार हजेरी लावली. पश्चिम भागातील धामणी, गोंदवले, दहिवडी, वावरहिरे, डंगीरेवाडी, शेवरी, दानवलेवाडी, हस्तनपूर, बिजवडी, पांगरी, बिदाल, शिंदी, वारुगड, मलवडी, कुळकजाई या ठिकाणी पाऊस पडत आहे.

तर तिकडे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातही सलग दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे छोटे बंधारे, ओढे, नाले भरले असून, काही ठिकाणी द्रांक्षे बागाचे मोठे नुकसान झाले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या