कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची शक्यता
20 November 09:43

कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची शक्यता


कोकण, मध्य महाराष्ट्रात आजही पावसाची शक्यता

कृषिकिंग, पुणे: पावसाला पोषक वातावरण असल्याने राज्यात वादळी पाऊस पडत आहे. दक्षिण कोकण, पश्‍चिम महाराष्ट्रात दाट ढग असून, मराठवाडा आणि विदर्भातही ढगाळ हवामान आहे. त्यामुळे आज(मंगळवारी) दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्‍ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमान मोठी वाढ झाल्याने थंडी गायब झाली आहे. अरबी समुद्रातील कमी दाब क्षेत्र निवळत आहे. मात्र बंगालच्या उपसागरात नव्याने तयार झालेल्या कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत आहे. यामुळे दक्षिण भारतातील राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर राज्यातही बुधवारपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या