राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपलं; पाहा कुठे झाला पाऊस...
19 November 17:58

राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपलं; पाहा कुठे झाला पाऊस...


राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाने झोडपलं; पाहा कुठे झाला पाऊस...

कृषिकिंग, पुणे: राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने झोडपले आहे. आज (सोमवारी) नंदुरबारसह जळगाव, बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. तर नाशिक जिल्ह्यातही काही भागांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळॆ या पावसाचा जिल्ह्यातील द्राक्ष पिकाला मोठा फटका बसणार आहे.

नंदुरबार शहरासह परिसरात सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल झाला. ढगाळ वातावरणात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. तर जळगाव, बुलडाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मात्र, वातावरणातील बदल आणि रिमझिम बरसणारा पाऊस यामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

दरम्यान, कोल्हापूर शहराला काल मध्यरात्री दोन वाजता मुसळधार पावसाने झोडपले. अर्धा तास शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाल्याने सखल भागात पाणी साचले होते. रविवारी दिवसभर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. तेव्हापासूनच पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. दुसरीकडे, सांगली जिल्ह्यातल्याही अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या