शेतकऱ्यांच्या हितासाठी पामतेलाच्या आयातीवर अंकुश लावणे गरजेचे- उद्योग
19 November 16:50

शेतकऱ्यांच्या हितासाठी पामतेलाच्या आयातीवर अंकुश लावणे गरजेचे- उद्योग


शेतकऱ्यांच्या हितासाठी पामतेलाच्या आयातीवर अंकुश लावणे गरजेचे- उद्योग

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशांतर्गत तेल उद्योग आणि तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी पाम तेलाच्या वाढत्या आयातीवर अंकुश लावण्याची गरज आहे. असे खाद्यतेल उद्योगातील व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. यासाठी सरकार आयात शुल्कात वाढ करू शकत नसेल तर यावरील जीएसटीमध्ये वाढ करावी. असेही या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, "मलेशियामध्ये कच्च्या पाम तेलाचा मोठ्या प्रमाणात साठा असल्याने, दरात घसरण झाली आहे. त्यामुळे देशातंर्गत बाजारात पाम तेलाची मोठ्या प्रमाणात आयात होत आहे. तर देशांतर्गत बाजारातील तेलबियांच्या दरांमध्ये घसरण होत असल्याने तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावे लागत आहे."

खाद्यतेल उद्योगातील व्यापारी पवन गुप्ता यांनी सांगितले आहे की, सरकारने पाम तेलावरील जीएसटीमध्ये सध्याच्या ५ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढ करावी. ज्यामुळे देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या कमी होण्यास मदत होणार आहे."संबंधित बातम्या