हवामान बदलामुळे परतीच्या पावसामध्ये घट
17 November 13:00

हवामान बदलामुळे परतीच्या पावसामध्ये घट


हवामान बदलामुळे परतीच्या पावसामध्ये घट

कृषिकिंग, पुणे: यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ापासून पाऊस गायब झाला, तो ऑक्टोबर अखेरपर्यंत बरसलाच नाही. या कालावधीत परतीचा पाऊस चांगला होत असल्यामुळे रब्बीच्या पिकांसाठी या पावसाचा चांगला लाभ होतो. मात्र यावर्षी परतीचा मान्सुन रुसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे. यावर राज्यातील मॉन्सून विषयक अभ्यासकांनी हवामानातील बदलांमुळे परतीच्या पावसामध्ये घट झाली असल्याचे सांगितले आहे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे व कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांवरच भर द्यावा. असे आवाहन या अभ्यासकांकडून करण्यात आले आहे.

यावर्षी छत्तीसगड, मध्यप्रदेश, पश्चिम बंगाल या दिशेने परतीच्या मान्सुनचा प्रवास झाला. काही प्रमाणात आंध्र प्रदेशातील काही भागात पाऊस झाला. दरवर्षी विदर्भ, मराठवाडा या भागात जो पाऊस होतो तो मान्सुनने दिशा बदलल्यामुळे झाला नाही. सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस, मराठवाडा व विदर्भात झाला. तुलनेने कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात पाऊस बरा झाला. सध्या चक्रीवादळ चेन्नईच्या दिशेने आहे. त्यामुळे वाऱ्याची दिशाही केरळच्या किनारपट्टीवरून वाहत आहे. त्यामुळे या महिन्यात होणारा पाऊस केरळ व चेन्नई परिसरात होईल. आपल्या भागात पाऊस होण्याची शक्यता नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.टॅग्स

संबंधित बातम्या