शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी ४५ गावांना भेट देणार- मकरंद अनासपुरे
15 November 14:02

शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी ४५ गावांना भेट देणार- मकरंद अनासपुरे


शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढण्यासाठी ४५ गावांना भेट देणार- मकरंद अनासपुरे

कृषिकिंग, मंगळवेढा(सोलापूर): यावर्षी शेतकरी मोठ्या दुष्काळाला तोंड देत आहेत. निव्वळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या काही गावांतील परिस्थिती आत्ताच भीषण बनली आहे. पुढे दहा महिने दुष्काळाचे आहेत, त्यामुळे आशा संकटात शेतकऱ्यांनी धीराने सामोरे जावे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील कायम दुष्काळी ४५ गावांना आपण भेट देणार असल्याचे प्रसिद्ध अभिनेते व नाम फौंडेशनचे संचालक मकरंद अनासपूरे यांनी सांगितले आहे.

सोलापूरच्या सांगोला तालुक्यातील मेडशिंगी येथिल कार्यक्रमास आल्यानंतर '४५ कोरडवाहू गांवे संघर्ष समिती'ने अभिनेते अनासपूरे यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी '४५ कोरडवाहू गांवे संघर्ष समिती'ला भेटण्यासाठी निमंत्रित केले होते. त्यावेळी अनासपूरे यांनी '४५ कोरडवाहू गावे संघर्ष समिती'च्या शिष्टमंडळास ही माहिती दिली आहे.संबंधित बातम्या