पीक कापणीची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या भागातही उपाययोजना करणार- मुख्यमंत्री
15 November 10:45

पीक कापणीची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या भागातही उपाययोजना करणार- मुख्यमंत्री

पीक कापणीची आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या भागातही उपाययोजना करणार- मुख्यमंत्री

कृषिकिंग, अकोला: पीक कापणीमध्ये आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्या भागातही त्या आधारावर दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजना लागू करणार येणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

अकोला जिल्ह्यातील पीकपाणी परिस्थिती, राज्य व केंद्र सरकारच्या अग्रक्रमाच्या योजनांची अंमलबजावणी आणि कायदा व सुव्यवस्थेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार संजय धोत्रे हेही उपस्थित होते.

याशिवाय राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्राकडे सात हजार कोटी रूपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.संबंधित बातम्या