राज्यात रब्बी हंगामातील पेरणी १७ टक्क्यांवर
07 November 11:00

राज्यात रब्बी हंगामातील पेरणी १७ टक्क्यांवर


राज्यात रब्बी हंगामातील पेरणी १७ टक्क्यांवर

कृषिकिंग, पुणे: पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम यावर्षीच्या खरीपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरण्याची गती खुंटली आहे. सध्यस्थितीत राज्यात रब्बीतील विविध पिकांची केवळ १७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.

राज्यात रब्बी पिकांचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. २ नोव्हेंबरपर्यंत राज्यात ७ लाख ५९ हजार ४७७ हेक्टरवर म्हणजेच १३ टक्के इतकी विविध पिकांची पेरणी झाली होती. तीन दिवसात ४ ते ५ टक्के इतकी वाढ झाली आहे. यात एकूण रब्बी कडधान्ये ७ लाख ५३ हजार ३१७ हेक्टर तर तेलबियाचे क्षेत्र ६ हजार १६० हेक्टर इतके आहे.

३१ ऑक्टोबरपर्यंत राज्यात ८८१.७ मि.मी. म्हणजेच ७३.६ टक्के पाऊस झाला. ३१ ऑक्टोबर अखेर राज्यातील एकूण ३५५ तालुक्यांपैकी एका तालुक्यात ० ते २५ टक्के, ४० तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १५७ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के,११३ तालुक्यात ७५ ते १०० टक्के तर ४४ तालुक्यात १०० टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला. जिल्हानिहाय आकडेवारी बघितल्यास सोलापूर, बीड या दोन जिल्ह्यांत २५ ते ५० टक्के एवढाचा पाऊस झाला आहे.टॅग्स