पुणे जिल्ह्यात धुवाँधार पाऊस; औरंगाबाद, जालना, साताऱ्यातही पाऊस
06 November 09:56

पुणे जिल्ह्यात धुवाँधार पाऊस; औरंगाबाद, जालना, साताऱ्यातही पाऊस


पुणे जिल्ह्यात धुवाँधार पाऊस; औरंगाबाद, जालना, साताऱ्यातही पाऊस

कृषिकिंग, पुणे: ऐन दिवाळीत राज्यातील काही भागात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह बेमोसमी पाऊस झाला. स्वाती नक्षत्राच्या अखेरच्या दिवशी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने नाशिकला तिघांचा बळी घेतला. तर पुण्यात सोमवारी धुव्वाधार पाऊस झाला. जालना औरंगाबाद, येथेही अवकाळी तडाखा बसला. तर तिकडे साताऱ्यातही अर्धा तास मुसळधार पाऊस झाला आहे.

पुणे जिल्ह्यात आंबेगाव, शिरूर आणि पुरंदर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. नाशिक जिल्ह्यात पावसाने शेतमालासह द्राक्षबागांचे नुकसान झाले आहे. खानदेशात जळगाव व धुळे जिल्ह्यात रविवारी व सोमवारी झालेल्या पावसाने केळी, कपाशीचे नुकसान झाले. पपईच्या बागांना फटका बसला. अकोला जिल्ह्यात बार्शीटाकळी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा शेकडो क्विंटल शेतमाल भिजल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, मुंबई व आसपासच्या परिसरासह कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात आज (६ नोव्हेंबर रोजी) हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या