शेतकऱ्यांनो..! सोयाबीन विक्रीची घाई करू नका- पाशा पटेल
05 November 18:32

शेतकऱ्यांनो..! सोयाबीन विक्रीची घाई करू नका- पाशा पटेल


शेतकऱ्यांनो..! सोयाबीन विक्रीची घाई करू नका- पाशा पटेल

कृषिकिंग, अमरावती: येत्या काही दिवसांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बदलाचा मोठा परिणाम शेतमालावर जाणवणार आहे. परिणामी मालाला अधिक भाव मिळणार आहे. त्यामुळे विदर्भातील शेतक-यांनी सोयाबीन उशिरा विकावे, असे आवाहन राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी केले आहे. ते अमरावती येथे बोलत होते.

केंद्र सरकारने सोयाबीन निर्यात धोरणात आमूलाग्र बदल केले आहे. चीन, अमेरिका, बांगलादेश, इराणला सोयाबीन निर्यातचा करार झाला आहे. पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये चीन येथील एक शिष्टमंडळ भारतात येणार आहे. ते देशातील सोयाबीन आॅईल केंद्राची पाहणी करतील. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर हे तेलावर नव्हे, तर पेंडावर ठरतात. त्यामुळे सरकारने अर्जेटिंना, अमेरिका, चीन यांच्यासोबत झालेल्या संयुक्त करारानुसार क्रूड आॅईल ड्युटीचे दर समान केले आहे. परिणामी येत्या काळात सोयाबीनला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात मागणी असेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विकण्याची घाई करू नये. असे आवाहन पाशा पटेल यांनी केले आहे.

सोयाबीन डी-आॅईल केकच्या २०० रेल्वे रॅक बांग्लादेशात पाठविल्या जाणार आहे. इराणनेदेखील मागणी केली आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनला सुगीचे दिवस येणार आहे. सोयाबीनसाठी जागतिक परिस्थिती तयार झाल्याची माहितीही पाशा पटेल यांनी यावेळी दिली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या