नाशिकसह, बुलडाणा, रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस
05 November 10:39

नाशिकसह, बुलडाणा, रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस


नाशिकसह, बुलडाणा, रत्नागिरी जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

कृषिकिंग, नाशिक: रविवारी संध्याकाळच्या सुमारास नाशिक, बुलडाणा, रत्नागिरी, व पुणे जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवाळी तोंडावर असताना या चार जिल्ह्यांसह राज्यात अनेक ठिकाणी पाऊस झाल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. तर पुढच्या दोन दिवसात (आज/उद्या) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.

नाशिकमध्ये रविवारी संध्याकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. शहरासह आजुबाजुच्या गावांमध्ये तासभर पाऊस झाल्याची माहिती आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून उकडा सहन करणाऱ्या नागरिकांना या पावसामुळे चांगला दिलासा मिळाला. तर रत्नागिरीतल्या चिपळुण आणि खेडमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला आहे. याशिवाय बुलढाणा जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पाऊस झाला आहे.

दरम्यान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात येत्या दोन दिवसात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या