८ नोव्हेंबर- दीपावली पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा/बलिप्रतिपदा)
08 November 08:00

८ नोव्हेंबर- दीपावली पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा/बलिप्रतिपदा)


८ नोव्हेंबर- दीपावली पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा/बलिप्रतिपदा)

“कृषिकिंग परिवारातर्फे सर्व शेतकरी बांधवांना ‘बलिप्रतिपदे’च्या हार्दिक शुभेच्छा...!”

बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. म्हणून कार्तिक शुक्ल प्रतिपदेला बलिप्रतिपदा असे म्हणतात.

दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेस खरिपाच्या काढणीचा शुभारंभ होतो. हा दिवस बलिप्रतिपदा म्हणजेच पाडवा. या दिवशी प्रदोष काळात बळीराजाची पूजा करतात. त्याचप्रमाणे रब्बी काढणीचा शुभारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेस म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी होतो. या दोन दिवसांचे महत्व शेतीच्या या दोन हंगामाबरोबर सणाच्या माध्यमातून जोडलेले आहे. हा दिवस विक्रम संवताचा आरंभ दिन आहे. पूर्वी व्यापारी लोकांचे या दिवशी नूतन वर्ष सुरु होत असे. (हिशोबासाठी) काही व्यापारी पहाटे वहीपूजन करतात. स्त्रिया आपल्या पतीला ओवाळतात ते आजच. काही लोक दीपावली मधील प्रमुख दिवस आजचा मानतात. याच दिवशी गोवर्धन पूजा, अन्नकुट करण्याची प्रथा आहे.

बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो । भविष्येंन्द्रासुराराते पूजयं प्रतिगृह्यताम् । । विरोचन पुत्र, बलिराजा तुला माझा नमस्कार असो. तू भविष्यातील इंद्र व असुरशत्रू आहेस. मी ही पूजा केलेली ग्रहण कर. सर्व सणामध्ये दीपावली उत्सव लोकप्रिय आहे. कारण पाऊस संपवून सुगीचे, समृद्धीचे दिवस सुरु झालेले असतात. म्हणून संपूर्ण समाज आनंदात असतो. आपल्या कष्टाच्या कमाईचा उपभोग घेण्याच्या इच्छेने दीपावलीचे हर्षाने स्वागत करतो.