७ नोव्हेंबर- लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)
07 November 08:00

७ नोव्हेंबर- लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)


७ नोव्हेंबर- लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)

“कृषिकिंग परिवारातर्फे सर्व शेतकरी बांधवांना ‘लक्ष्मीपूजन’च्या हार्दिक शुभेच्छा...!”

या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली व लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी 'लक्ष्मीपूजन' करतात. तसेच या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.