इथे...गायीला मिठी मारण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करताहेत
11 November 11:00

इथे...गायीला मिठी मारण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करताहेत


इथे...गायीला मिठी मारण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करताहेत

कृषिकिंग, पुणे: विज्ञानानेही हे मान्य केलं आहे की, मनुष्याच्या मेंदूला प्राण्यांसोबत खेळण्याने आणि त्यांच्यासोबत वेळ घालवल्याने आराम मिळतो. याची अनेक उदाहरणे आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळतात. भारतात कुत्र्यांसोबतच गायी आणि म्हशीही पाळण्याची प्रथा आहे. गाय तर राजकारणाचा मुद्दाही झाली आहे. पण सद्या अमेरिकेतही गायी प्रति प्रेम भरभरून वाहत आहे.

अमेरिकेत सुरु असलेल्या या अभियानासाठी लोक ९० मिनिटांसाठी ३०० डॉलर इतका खर्च करत आहेत. भारतीय चलनानुसार ही रक्कम २२ हजार रुपये इतकी आहे. न्यूयॉर्कच्या माऊंटेन हॉर्स फार्ममध्ये एक उपक्रम राबवण्यात आला होता. याला हॉर्स आणि काऊ एक्सपीरियंस नाव देण्यात आलं होतं. यात जनावरांसोबत खेळणे आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणे हे होतं. जर जनावरांना खेळण्याचा मूड नसेल तर तुम्ही त्यांना मिठी मारुन बसूही शकता. याने लोकांना सकारात्मक जाणीव होत आहे.

याचं वैज्ञानिक कारण सांगितलं जात आहे की, गायीच्या शरीराचं तापमान हे मनुष्याच्या शरीरापेक्षा जास्त असतं. तसेच त्यांच्या हृदयाची गतीही मनुष्याच्या हृदयापेक्षा जास्त असते. त्यामुळे लोकांना यातून सकारात्मक वाटतं. पण याची सत्यता समोर आली नाही. मात्र उपक्रम राबवणाऱ्या लोकांनी त्यांच्या वेबसाईटवर तशी माहिती दिली आहे. या अभियानात घोडेही ठेवण्यात आले आहेत. लोक यात भाग घेण्यासाठी ७५ डॉलर प्रति तास खर्च करत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे वेगवेगळ्या देशातून लोक या माऊंटेन हॉर्स फार्ममध्ये पोहोचत आहेत. आणि कोणताही संकोच न करता आपला खिसा रिकामा करत आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या