५ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये
31 October 08:30

५ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये


५ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन पैठणमध्ये

कृषिकिंग, पुणे: लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकऱ्यांच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तिशाली सृजनशील साहित्यिकांची नवीन पिढी निर्माण करण्यासाठी २ व ३ फेब्रुवारी २०१९ रोजी संत एकनाथ ज्ञानपीठ, माहेश्वरी जनकल्याण सभागृह, पैठण (औरंगाबाद) येथे दोन दिवसीय ५ वे अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक तथा शेतकरी कवी इंद्रजीत भालेराव हे या संमेलनाचे संमेलनाध्यक्षपद भूषविणार आहेत.

दोन दिवस चालणाऱ्या या संमेलनात मुक्त बाजारव्यवस्थेत शेतीचे भवितव्य जनुकीय तंत्रज्ञान: शोध आणि बोध सनातन शेतीचा चक्रव्यूह कर्जमुक्ती शेतीची कि शेतकऱ्यांची? शेतीप्रधान साहित्य आणि साहित्यिक बदलती शेती, बदलती सरकार आणि लावू पणाला प्राण! अशा विविध विषयावरील एकूण ७ परिसंवाद राहणार आहे. या परिसंवादात ज्येष्ठ साहित्यिक, ज्येष्ठ शेतकरी नेते, शेती अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आदी अनुभवी वक्ते भाग घेणार असल्याने हे या संमेलनाचे वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण असणार आहे.

४ थे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे मुंबई येथे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे अध्यक्षपद जेष्ठ साहित्यिक कवी डॉ. विठ्ठल वाघ यांनी भूषवले होते.संबंधित बातम्या