सांगलीच्या कृषी प्रदर्शनात सर्वात बुटक्या 'अंबु' गाईची चर्चा
30 October 15:44

सांगलीच्या कृषी प्रदर्शनात सर्वात बुटक्या 'अंबु' गाईची चर्चा


सांगलीच्या कृषी प्रदर्शनात सर्वात बुटक्या 'अंबु' गाईची चर्चा

कृषिकिंग, सांगली: क्रांती उद्योग व शिक्षण सेवक प्रमुख अरुण अण्णा लाड यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यातील पलूस येथे राजस्तरीय कृषि, पशु-पक्षी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. शेतीतील आधुनिक सामुग्री, नवे तंत्रज्ञान, शेतीविषयक वस्तू, विविध प्रकारची जनावरे आणि खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. परंतु, सर्व गर्दीत चर्चेचा व कुतूहलाचा विषय ठरली बुटकी अंबु गाय...

उंची २ फूट ३ इंच आणि ३ फूट लांबीची अंबु आहे. अंबु ही खिलार जातीची मिक्स गाय असून, ती साडे चार वर्षांची आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातल्या कनेरसरच्या या अंबूने आपल्याकडे चांगलीच गर्दी खेचून घेतली होती. विशेष म्हणजे तिला बघण्यासाठी १० रुपये तिकीट ठेवण्यात आले होते. संपूर्ण प्रदर्शनात बुटकी उर्फ लहान गाय अशा आशयाचे फरक लावून अंबूच्या मालकाने तिचे चांगलेच मार्केटिंग केले होते.

भारतातील सर्वात लहान अर्थात बुटकी गाय म्हणून अंबूची ओळख आहे. तिचे विशेषतः म्हणजे ती सर्वसाधारण गाईच्या तुलनेत केवळ २५ टक्केच खाद्य खाते.संबंधित बातम्या