मूग, उडीद, सोयाबीन नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ- सुभाष देशमुख
24 October 18:50

मूग, उडीद, सोयाबीन नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ- सुभाष देशमुख

मूग, उडीद, सोयाबीन नोंदणीसाठी १५ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ- सुभाष देशमुख

कृषिकग मुंबई: "किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत २०१८-१९ च्या खरीप हंगामातील मूग, उडीद, सोयाबीन नोंदणीसाठी १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत नोंदणी करता येणार आहे." अशी माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली आहे.

याआधी मूग, उडीद नोंदणीसाठी २४ ऑक्टोबर २०१८ आणि सोयाबीन नोंदणीसाठी ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ करण्यात आल्याने आता शेतकऱ्यांना १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मूग, उडीद आणि सोयाबीन नोंदणी करता येणार आहे.संबंधित बातम्या