दुष्काळी भागातून मागणी वाढल्याने बाजरीच्या भावात वाढ
19 October 18:07

दुष्काळी भागातून मागणी वाढल्याने बाजरीच्या भावात वाढ


दुष्काळी भागातून मागणी वाढल्याने बाजरीच्या भावात वाढ

कृषिकिंग, नाशिक: आवक कमी व मागणी वाढल्याने नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात बाजरीच्या भावात वाढ झाली आहे. मागील आठवड्यात १६०० ते १८०० रुपये प्रतिक्विंटल असलेली बाजरी या आठवड्यात १८७५ ते २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत विकली जात आहे.

लासलगाव बाजार समितीत बाजरीला २१०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळत आहे. तर मालेगाव बाजार समितीमध्ये १००० ते १२०० पोत्यांची दररोज आवक होत असून, १८७५ ते २००० रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे.

मका, सोयाबीनच्या बाजारातही थोड्याफार प्रमाणात तेजी आली आहे. लासलगाव बाजार समितीत मकाला सध्या १४५२ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मागील आठवड्यात लासलगावला १२०० ते १४६० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत भाव होता. तर लासलगाव बाजार समितीत सोयाबीनला ३३१५ ते ३२९० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

"सध्या लातूर, नगर भागातून बाजरीला मागणी वाढल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य माल तिकडे जात असल्याने भावात वाढ झाली आहे." असे लासलगाव बाजार समितीतील एका स्थानिक व्यापाऱ्याने सांगितले आहे.संबंधित बातम्या