कर्नाटक, तेलंगणातुन सोयाबीन व उडीद खरेदीला केंद्राची मंजुरी
19 October 11:06

कर्नाटक, तेलंगणातुन सोयाबीन व उडीद खरेदीला केंद्राची मंजुरी


कर्नाटक, तेलंगणातुन सोयाबीन व उडीद खरेदीला केंद्राची मंजुरी

कृषिकिंग, नवी दिल्ली: "केंद्र सरकारने प्राईस सपोर्ट स्कीमअंतर्गत (पीएसएस) कर्नाटकातून हमीभावाने सोयाबीन व उडीद खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच कर्नाटकातील शेतकऱ्यांकडून २७८ कोटी रुपये मूल्याच्या ८१ हजार ८०० मेट्रिक टन सोयाबीनची तर ५०.८२ कोटी रुपये मूल्याच्या ९ हजार०७५ मेट्रिक टन उडीदाची खरेदी करण्यात येणार आहे." अशी माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी दिली आहे.

याशिवाय सरकारने प्राईस सपोर्ट स्कीमअंतर्गत (पीएसएस) तेलंगणामधील शेतकऱ्यांकडून हमीभावाने उडीद खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच तेलंगणामधील शेतकऱ्यांकडून ३३.३२ कोटी रुपये मूल्याच्या ५ हजार ९५० मेट्रिक टन उडीदाची खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीचा कालावधी हा खरेदी सुरु होणाऱ्या दिनांकापासून पुढील ३ महिन्यांसाठी असणार आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने चालू खरीप हंगामासाठी सोयाबीनला ३३९९ रुपये प्रति क्विंटल तर उडीदासाठी ५ हजार ६०० रुपये किमान आधारभूत किंमत निर्धारित केली आहे.संबंधित बातम्या