शेतकऱ्यांनो...सोयाबीन विक्रीची घाई करू नका
17 October 12:54

शेतकऱ्यांनो...सोयाबीन विक्रीची घाई करू नका


शेतकऱ्यांनो...सोयाबीन विक्रीची घाई करू नका

कृषिकिंग, पुणे: खरीप हंगामातील सोयाबीन निघण्यास सुरुवात झाली असून, अनेक शेतकरी शेतातून निघालेले सोयाबीन थेट बाजारात विक्रीसाठी आणत आहे. मात्र, सोयाबीन विक्रीची घाई शेतकऱ्यांनी करू नये. बाजारभाव वधारण्याची दाट शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

यावर्षी राज्यात सोयाबीनचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. याशिवाय केंद्र सरकारने सोयाबीनवर ४४ टक्के आयात शुल्क लागू केले असून, सोयाबीन निर्यातीवर १० टक्के सबसीडी जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने चीन सोबत ४० लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करण्याचा करार केला आहे. त्यामुळे येत्या काळात सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे. असे कृषी तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सोयाबीनची बहुतांश खरेदी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांकडून केली जाते. शासनाची नाफेडमार्फत सोयाबीन खरेदी अजूनही सुरु झालेली नाही. केवळ आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. दरम्यान, केंद्र सरकारने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी सोयाबीनला ३ हजार ३९९ प्रति क्विंटल इतका हमीभाव निर्धारित केला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या