आता कुठे गेला सरकारचा गायींबाबतचा कळवळा? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल
17 October 09:59

आता कुठे गेला सरकारचा गायींबाबतचा कळवळा? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल


आता कुठे गेला सरकारचा गायींबाबतचा कळवळा? संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

कृषिकिंग, औरंगाबाद: गोवंशाचा आदर करा, गोवंश हत्या करू नका, शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन करा, अशा सल्ल्यांचे डोस देणारे, गायींविषयी कळवळा व्यक्त करणारे सरकार खुट्यावरच पशुधन तडफडत असताना चारा छावण्या उभारण्यासाठी तत्परता का दाखवीत नाही, असा संतप्त सवाल शेतकरी करीत आहे.

शासन दरबारातून फर्मान सुटल्यामुळे मंत्री दुष्काळाची पाहणी करीत आहेत. त्यांना शेतकऱ्यांची हतबलता दिसत नाही का? दुष्काळ जाहीर करण्याचे पारंपरिक मुहूर्त शोधण्यापेक्षा तो जाहीर करण्याची आवश्‍यकता आहे अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. तीन महिन्यांपासून पावसाने पाठ फिरविल्यामुळे खरिपाचे पीक गेले, रब्बीचीही हीच स्थिती असल्यामुळे यंदाचा दुष्काळ दिवाळीपूर्वीच सुरू झाला आहे. मराठवाड्यात जिथे माणसांना पिण्याचे पाणी नाही, तिथे जनावरांचा सांभाळ कसा करायचा, या चिंतेने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे.संबंधित बातम्या