यावर्षी ११४.८३ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता- सोपा
12 October 11:39

यावर्षी ११४.८३ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता- सोपा


यावर्षी ११४.८३ लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता- सोपा

कृषिकिंग, नवी दिल्ली: लागवडीत वाढ झाल्याने चालू खरीप हंगामात देशातील सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होऊन, ते ११४.८३ लाख टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. सोयाबीन प्रोसेसर्स एसोसिएशन आॅफ इंडियाकडून (सोपा) प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार मागील वर्षी ८३.५५ लाख टन इतके सोयाबीनचे उत्पादन नोंदवले गेले होते.

सोपाचे उपाध्यक्ष नरेश गोयंका यांनी सांगितले आहे की, "प्रमुख उत्पादक राज्य मध्यप्रदेशात सोयाबीनच्या उत्पादनात यावर्षी वाढ होऊन, ते ५९.१७ लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत ४२ लाख टन इतके नोंदवली गेले होते. याचप्रमाणे महाराष्ट्रात मागील वर्षीच्या २९.०५ लाख टनांवरून ३८.३५ लाख टनांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. तर राजस्थानमध्ये मागील वर्षीच्या ७.५० लाख टनांवरून ९.४४ लाख टनांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे."

याशिवाय तेलंगणामध्ये १.५७ लाख टन, कर्नाटकमध्ये २.९० लाख टन, छत्तीसगडमध्ये १.१० लाख टन, गुजरातमध्ये १.२४ लाख टन आणि अन्य राज्यांमध्ये १.०४ लाख टन इतके सोयाबीन उत्पादन होण्याची शक्यता आहे. असेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, प्रमुख देशातील उत्पादक बाजार समित्यांमध्ये दररोज पाच ते साडे सहा लाख क्विंटल इतकी सोयाबीनची आवक होत आहे. तर सोयाबीनला सरासरी २९०० ते २९५० रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या