महाराष्ट्र सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन ठरली देशातील दुसरी मोठी सोयामिल मॅन्युफॅक्चरर निर्यातदार कंपनी
10 October 15:45

महाराष्ट्र सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन ठरली देशातील दुसरी मोठी सोयामिल मॅन्युफॅक्चरर निर्यातदार कंपनी


महाराष्ट्र सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन ठरली देशातील दुसरी मोठी सोयामिल मॅन्युफॅक्चरर निर्यातदार कंपनी

कृषिकिंग, इंदोर(मध्यप्रदेश): धुळ्यातील सोयाबीन क्रशिंग उद्योगाला आता देशव्यापी मान्यता मिळाली असून, महाराष्ट्र सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्शन प्रा. लि. ही देशातील दुसरी मोठी सोयामिल मॅन्युफॅक्चरर निर्यातदार आणि तिसरी मोठी मर्चंट निर्यातदार कंपनी ठरली आहे. याच कामगिरीसाठी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशनच्या वतीने इंदोर येथे झालेल्या इंटरनॅशनल सोया कॉन्क्लेव्हमध्ये कंपनीस केंद्रीय कृषिराज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. कंपनीचे संचालक रवी अग्रवाल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. महाराष्ट्र कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल हेही यावेळी उपस्थित होते.

धुळे हे भारतातील सोयाबीन प्रोसेसिंगचे मोठे केंद्र आहे. सर्व ऑईल मिल्स मिळून प्रतिदिन सुमारे ३ हजार टन सोयाबीनचे क्रशिंग होते. ज्याद्वारे ५ हजार पेक्षा लोकांना थेट रोजगार मिळाला आहे. देशातील एकूण सोयाबीन गाळपात १० टक्के वाटा होईल इतकी सोयाबीन गाळप क्षमता अग्रवाल बंधुंच्या उद्यमशीलतेतून उभी राहिली आहे. विशेष म्हणजे गुणवत्तेत चांगले नाव त्यांनी राखले आहे.

पोल्ट्री खाद्यातील सुमारे ४० टक्के खर्च सोयामिलवर होतो. राज्यातील बहुतांश पोल्ट्री उद्योग मुख्यत्वे करून धुळ्यातूनच सोयामिलची खरेदी करतात. मंदीच्या चक्रामुळे पोल्ट्री उद्योग जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा सर्वच अग्रवाल बंधु एक विश्वासू पुरवठादार म्हणून मदतीचा हात देतात.संबंधित बातम्या