जुन्याच पद्धतीने होतय पावसाचे मोजमाप; आकडेवारी कितपत खरी?
10 October 12:46

जुन्याच पद्धतीने होतय पावसाचे मोजमाप; आकडेवारी कितपत खरी?


जुन्याच पद्धतीने होतय पावसाचे मोजमाप; आकडेवारी कितपत खरी?

कृषिकिंग, पुणे: सध्याची बदलती नैसर्गिक परिस्थितीमुळे बैलाचे एक शिंग ओले, तर दुसरे कोरडे राहते इतका पाऊस लहरी झाला आहे. त्यातच राज्यातील ४४ हजार ६०० गावांचा पाऊस अवघ्या २ हजार ८२ ठिकाणच्या पर्जन्यमापक यंत्रांद्वारे मोजला जातो. त्यामुळे राज्यातील पडलेल्या पावसाची आकडेवारी कितपत खरी व वास्तवतेला धरून आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी महसूल विभागाकडून प्रत्येक मंडळ, ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालयावर पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. पावसाळ्यात दररोज सकाळी आठला २४ तासांत पडलेल्या पावसाची नोंद घेतली जाते. तेथे पडलेला पाऊस म्हणजे मंडळातील समाविष्ट गावांचा पाऊस समजला जातो.

मात्र, सध्याच्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज खुद्द राज्याच्या हवामान खात्यालाही येत नाही. त्यामुळे एकाच गावातील पर्जन्यमापकावरून मंडळातील इतर समाविष्ट गावांचा पाऊस गृहीत धरणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. त्यामुळे शासनाने किमान गावपातळीवर पाऊस मोजण्याची यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.संबंधित बातम्या