राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस- कृषी विभाग
10 October 11:50

राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस- कृषी विभाग


राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस- कृषी विभाग

कृषिकिंग, मुंबई: राज्यावर दुष्काळाची छाया गडद झाल्याचे कृषि विभागाच्या अहवालावरून समोर आले आहे. यावर्षी राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस झाला असून, २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे.

औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीड यांसह राज्यातील १३ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यात २५ ते ५० टक्के, १४३ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.१२१ तालुक्यात ७५ ते १०० पाऊस पडला आहे. केवळ ६३ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.

पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. कापूस या खरिपातील पिकावर रस शोषणा-या किडीचा व शेंदरी बोंडअळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. तर भात पिकावर काही ठिकाणी पिवळा खोडकिडा आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे. असेही कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.संबंधित बातम्या