पशुपालकांमध्ये वाढतंय देशी गायींचे आकर्षण- कृषिमंत्री
09 October 16:25

पशुपालकांमध्ये वाढतंय देशी गायींचे आकर्षण- कृषिमंत्री


पशुपालकांमध्ये वाढतंय देशी गायींचे आकर्षण- कृषिमंत्री

कृषिकिंग, मथुरा(ऊत्तरप्रदेश): "देशातील शेतकरी व पशुपालक सध्या विदेशी प्रजातींच्या गायींएवजी देशी गायींच्या संगोपनावर भर देत आहेत. त्यामुळे अपेक्षा आहे की येणाऱ्या काळात प्रत्येक पशुपालकाकडे देशी गायी असतील." असे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले आहे.

उत्तरप्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील मध्य धौरेरा गावात १९३५ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापित केलेल्या गोशाळेची पाहणी करण्यासाठी कृषिमंत्री आले होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. या गोशाळेतील गीर, थरकार्पर, हरियाणा, सिंधी या देशी गायींचे मोठे समूह त्यांनी पाहिले. तेव्हा सिंह यांनी आशा व्यक्त केली आहे की, दुसऱ्या गोशाळा, पशुपालकांनीही याच पद्धतीने देशी गायींचे संगोपन करण्याची गरज आहे.संबंधित बातम्या