भारतीय तेलबियांच्या निर्यातीत ९ टक्क्यांनी वाढ
08 October 18:42

भारतीय तेलबियांच्या निर्यातीत ९ टक्क्यांनी वाढ


भारतीय तेलबियांच्या निर्यातीत ९ टक्क्यांनी वाढ

कृषिकिंग, नवी दिल्ली: चालू वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये भारतीय तेलबियांच्या निर्यातीत टक्क्यांनी वाढ होऊन, ती १४.०३ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. मुंबई-स्थित सॉल्व्हेंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशन ऑफ इंडियाने (एसईए) संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल-सप्टेंबर २०१८ दरम्यान देशातुन १४ लाख ३ हजार ३८२ टन इतकी तेलबिया निर्यात झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत १२ लाख ८४ हजार ७८८ टन इतकी नोंदवली गेली होती.

व्हियेतनाम, थायलंड, फ्रान्स, जर्मनी, दक्षिण कोरिया, या देशांमध्ये भारतीय तेलबियांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये मोहरीची निर्यातीत दुपटीने वाढ होऊन, ती ३ लाख ६२७ टनांवरून ६ लाख १ हजार १०५ टनांवर पोहचली आहे. यामध्ये दक्षिण कोरिया, व्हिएतनाम आणि थायलंड हे प्रमुख आयातदार देश आहेत. मात्र असे असले तरी सोयाबीनच्या निर्यातीत ४ लाख ८९ हजार ९२६ टनांवरुन घट होऊन, ती ३ लाख ९२ हजार ७३६ टनांपर्यंत घसरली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या