महाराष्ट्रातून २.५० लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यास केंद्राची मंजुरी
05 October 18:45

महाराष्ट्रातून २.५० लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यास केंद्राची मंजुरी


महाराष्ट्रातून २.५० लाख मेट्रिक टन सोयाबीन खरेदी करण्यास केंद्राची मंजुरी

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारने प्राईस सपोर्ट स्कीमअंतर्गत (पीएसएस) महाराष्ट्रातून हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे. यामुळे लवकरच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडून ८५० कोटी रुपये मूल्याच्या २.५० लाख मेट्रिक टन सोयाबीनची खरेदी करण्यात येणार आहे.

यासोबतच अन्य राज्यांमधून तेलबिया खरेदी करण्यासाठीही केंद्राने मंजुरी दिली आहे. मध्यप्रदेशातून ५० हजार मेट्रिक टन तीळ, तर ९२ हजार २५० मेट्रिक टन भुईमूग खरेदीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे. तसेच राजस्थानमधून ३.६९ लाख मेट्रिक टन लाख सोयाबीन तर ३.८९ लाख टन भुईमूग खरेदीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे.

याशिवाय, आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने चालू खरीप हंगामात (२०१८-१९) जवळपास २९.८१ कोटी रुपये मूल्याच्या ५ हजार २३४ दशलक्ष टन उडीद खरेदीसाठीही केंद्राने आज मंजुरी दिली आहे.संबंधित बातम्या