सोयापेंडच्या निर्यातीत ७० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता
05 October 08:30

सोयापेंडच्या निर्यातीत ७० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता


सोयापेंडच्या निर्यातीत ७० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: देशाची सोयामील (सोयापेंड) निर्यात २०१८-१९ या वर्षात मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत निर्यातीत ७० टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. जगात सोयाबीनचा सगळ्यात मोठा खरेदीदार देश असलेला चीन भारतातून खरेदी करण्याची शक्यता असल्याचा हा परिणाम असेल, असे सोया उद्योगातील जाणकारांनी सांगितले आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची सुरू असलेली घसरण आणि देशात सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता यामुळे भारत चीनच्या बाजारपेठेत यशस्वी धडक देऊ शकेल, असे मानले जात आहे. चीन आणि अमेरिकेतील व्यापारयुद्धाचा परिणाम म्हणून चीनने अमेरेकेतून आयात होणाऱ्या प्रमुख शेतीमालावरील शुल्कात मोठी वाढ केली आहे. त्यामुळे चीनला आता सोयाबीनच्या बाबतीत अमेरिकेशिवाय अन्य पर्याय शोधण्यावाचून गत्यंतर नाही. त्या दृष्टीने भारतातील सोयामीलची चीन मोठ्या प्रमाणावर खरेदी करेल, असे सांगण्यात येत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या