चीन-अमेरिका व्यापारयुद्धाचा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा
27 September 08:30

चीन-अमेरिका व्यापारयुद्धाचा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा


चीन-अमेरिका व्यापारयुद्धाचा भारतीय सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फायदा

कृषिकिंग, नवी दिल्ली: अमेरिका-चीन यांच्यातील व्यापारयुद्धाचा आणि घसरलेल्या रुपयाच्या मूल्याचा थेट फायदा देशातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे. या दोन कारणांमुळे यावर्षी सोयाबीनला हमीभावापेक्षा अधिक दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चीनला लागणारा सोयाबीन आणि डीओसीचा पुरवठा अमेरिकेने बंद केला असून, चीनने या उत्पादनांसाठी भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. चीनमध्ये भारतीय सोयाबीन आयातीवर यापूर्वी बंदी होती, ती आता उठवण्यात आली आहे. त्यातच आता भारत सरकारने सोयाबीन आणि बाय-प्रोडक्टसवरील निर्यात शुल्कात सूट दिली आहे. त्यामुळे भारतातील सोयाबीनला चांगला दर मिळण्यासाठी आशा पल्लवित झाल्या आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय डीओसीला असलेली प्रचंड मागणी आणि उत्पादन कमी याचाही परिणाम सोयाबीनच्या दरात वाढ होण्याचे संकेत दाखवत आहे.टॅग्स

संबंधित बातम्या