हिमाचल प्रदेशात ढगफुटी; महापुराचा हाहाकार
24 September 14:35

हिमाचल प्रदेशात ढगफुटी; महापुराचा हाहाकार


हिमाचल प्रदेशात ढगफुटी; महापुराचा हाहाकार

कृषिकिंग, शिमला(हिमाचल प्रदेश): हिमाचल प्रदेशात अतिवृष्टी आणि पुराने थैमान घातले असून, गेल्या ४८ तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सर्वत्र हाहाकार सुरु आहे. मुसळधार पावसाने कुल्लू-मनाली राष्ट्रीय महामार्गासह १२६ रस्ते बंद पडले आहेत. राष्ट्रीय महामार्गावर कुल्लूच्या ओट येथे ढगफुटीने काही लोक अडकले होते. त्यांना हेलिकॉप्टरने बाहेर काढून विमानतळावर सुखरूप सोडण्यात आले आहे. तसेच पुरात अडकलेल्या सर्वच नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ठिक-ठिकाणी बचाव मोहिमा सुरू आहेत.

प्रशासनाकडून नागरिकांना नदी, नाल्यांपासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सोबतच, अतिवृष्टीच्या परिस्थितीत उंच ठिकाणी राहावे असे आवाहन केले जात आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, हिमाचल प्रदेशात सर्वात वाईट परिस्थिती मंडी आणि हमीरपूर जिल्ह्यांत आहे. येथे जवळपास सर्वच नद्यांना पूर आले आहे. चंबा जिल्ह्याला जोडणाऱ्या शंभर वर्षे जुन्या शितला ब्रिजला दरी पडली आहे.संबंधित बातम्या