कोल्हापुरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस
21 September 12:24

कोल्हापुरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस


कोल्हापुरात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस

कृषिकिंग, कोल्हापूर: तीन आठवडय़ांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढत चालला असतानाच काल संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरणानंतर कोल्हापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. शहर परिसरात जवळपास पाऊण तास परतीचा पाऊस धिंगाणा घालत होता. सायंकाळी जिल्ह्यतील काही भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली.

गेल्या महिन्यात पावसाने जवळपास रोजच हजेरी लावली होती. नदी, धरणांच्या पाणीसाठय़ात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. शेतात पाणी साचून राहिल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होऊ लागली होती. मात्र, गेले तीन आठवडे चित्र पूर्णत: बदलले आहे. सप्टेंबर महिन्यातच ‘ऑक्टोबर हीट’चा कडाका जाणवू लागला होता. उगवलेल्या पिकांना पाण्याची गरज भासू लागली होती.

तर, दुसरीकडे कृष्णी-पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घट झाल्याने बाप्पाचे विसर्जन कसे करायचे याचा पेच गणेश मंडळांना पडला होता. पावसाची गरज भासत असतानाच आज दुपारी वरुणराजा प्रसन्न झाला. आणि पावसाने हजेरी लावली. वातावरणात गारवा निर्माण झाला होता. त्यामुळे आता पिके हातातून जाण्याचा धोका असतानाच पावसाची कृपा झाल्याने बळीराजा काहीसा सुखावला आहे.टॅग्स

संबंधित बातम्या