गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य
21 September 10:24

गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य


गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य

कृषिकिंग, डेहरादून(उत्तराखंड): गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. उत्तराखंड विधानसभेमध्ये यासंबंधीचे विधेयक पारित करण्यात आले असून, हा प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे.

उत्तराखंडच्या पशुपालन मंत्री रेखा आर्य यांनी हा प्रस्ताव विधानसभेत मांडला होता. या प्रस्तावाबाबत आर्य यांनी म्हटले की, ''आपणा सर्वांना गायीचे महत्त्व माहिती आहे. केवळ भारतातच नव्हे तर दुसऱ्या देशांमध्येही गायींचा सन्मान केला जातो. धार्मिक ग्रंथांमध्येही गायींचा उल्लेख करण्यात आला आहे. असे म्हणतात की गायीच्या पोटात ३३ कोटी देव असतात. जर गायीला राष्ट्रमातेचा दर्जा मिळाला तर तिच्या सुरक्षेसाठी योग्य ती पावलं उचलली जातील, जेणेकरुन गोहत्या बंद होतील''



संबंधित बातम्या