सोयाबीनची लागवड वाढली तर भुईमुगाच्या लागवडीत अल्पशी घट
16 September 13:00

सोयाबीनची लागवड वाढली तर भुईमुगाच्या लागवडीत अल्पशी घट


सोयाबीनची लागवड वाढली तर भुईमुगाच्या लागवडीत अल्पशी घट

कृषिकिंग, नवी दिल्ली: चालू खरीप हंगामात तेलबियांच्या लागवडीत वाढ झाली आहे. सध्यस्थितीत देशभरात १७३.९५ लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड करण्यात आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत १६९.२० लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती.

तेलबियांमधील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनच्या लागवडीत वाढ होऊन, ती १११.९२ लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच १०५.२६ लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. सोयाबीननंतर महत्वाचे तेलबिया पीक असलेल्या भुईमुगाच्या लागवडीत अल्पशी घट झाली असून, ती ३९.८७ लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ४०.७६ लाख टन इतकी नोंदवली गेली होती.टॅग्स

संबंधित बातम्या