महाराष्ट्रातून चीनला सोयाबीन पेंड निर्यात करण्याचे संकेत
11 September 10:45

महाराष्ट्रातून चीनला सोयाबीन पेंड निर्यात करण्याचे संकेत


महाराष्ट्रातून चीनला सोयाबीन पेंड निर्यात करण्याचे संकेत

कृषिकिंग, मुंबई: राज्यातून आगामी हंगामात सोयाबीन पेंड चीनला निर्यात करण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि चीन सरकारमध्ये कराराच्या माध्यमातून लवकरच या निर्णयाला मूर्त स्वरूप देण्यात येणार आहे. याद्वारे राज्यातील उत्पादनाचा विचार करता शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळण्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले जात आहे.

नाफेडचे व्यवस्थापकीय संचालक संजीव चढ्ढा यांच्या नेतृत्वाखालील भारताचे शिष्टमंडळ नुकतेच चीनला जाऊन आले. येत्या १९ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा भारतीय उद्योगपतींचे शिष्टमंडळ चीनच्या दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय सोयाबीन, मोहरीची पेंड चीनला पुरवठा करण्याच्या उद्देशाने हा दौरा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सोयाबीनच्या बाजारातील दरामागचे अर्थकारण सोयाबीनच्या तेलावर नव्हे तर सोयाबीन उत्पादित पेंड दर ठरवण्यात महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे दिसून येते. एक क्विंटल सोयाबीनपासून १८ किलो तेल तर ८२ किलो पेंड तयार होते. त्यामुळे पेंडीला असणारी मागणी आणि किंमत सोयाबीनचे दर ठरवण्यास उपयुक्त ठरत असतात.

भारतीय सोयाबीन पेंड ही जनुकीय संकरित नसल्याने (नॉन जेनेटिकली मोडिफाईड) तिचा दर्जा उत्कृष्ठ समजला जातो. त्यामुळे जगभरातील ग्राहकांकडून मागणी असते. विशेषतः चीन ही त्यासाठीची मोठी बाजारपेठ आहे. मागे तांत्रिक कारणांमुळे चीनने भारतीय पेंड परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा एकदा चीनची बाजारपेठ भारताला खुणावते आहे.



टॅग्स

संबंधित बातम्या