तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार १० हजार कोटींचा निधी घोषित करणार
10 September 17:20

तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार १० हजार कोटींचा निधी घोषित करणार


तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकार १० हजार कोटींचा निधी घोषित करणार

कृषिकिंग, नवी दिल्ली: तेलबिया उत्पादक शेतक-यांना संरक्षण देण्यासाठी मध्यप्रदेश सरकारच्या भावांतर योजनेच्या धर्तीवर राष्ट्रीय पातळीवर एक नवीन योजना सुरु करण्याचा प्रस्ताव केंद्रीय कृषी मंत्रालयाने तयार केला आहे. या प्रस्तावाअंतर्गत केंद्र सरकार लवकरच तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींच्या निधीची घोषणा करू शकते. या निधीचा उपयोग तेलबियांचा दर हमीभावापेक्षा खाली घसरल्यास शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी होणार आहे.

देशातील जनतेला खाद्यतेलाची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून राहावे लागते. भारत दरवर्षी सुमारे १४ ते १५ दशलक्ष टन खाद्यतेल आयात करतो, जी एकूण देशांतर्गत मागणीच्या ७० टक्के आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरात हे देशातील प्रमुख तेलबिया उत्पादक आहेत. या राज्यांतील आगामी विधानसभा निवडणूका पाहता, या राज्यांतील शेतकऱ्यांना गोंजारण्यासाठी सरकारकडून या १० हजार रुपयांच्या निधीची घोषणा केली जाऊ शकते.

अधिकृत आकडेवारीनुसार, २०१७-१८ मध्ये तेलबियांचे उत्पादन ३१.३१ दशलक्ष टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी (२०१६-१७) याच कालावधीत ३१.२८ दशलक्ष टन इतके नोंदवले गेले होते.संबंधित बातम्या