उत्पादक राज्यांतील अनुकूल हवामानामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढणार- सोपा
10 September 15:45

उत्पादक राज्यांतील अनुकूल हवामानामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढणार- सोपा


उत्पादक राज्यांतील अनुकूल हवामानामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढणार- सोपा

कृषिकिंग, नवी दिल्ली: चालू खरीप हंगामात लागवडीतील वाढीबरोबरच हवामानही अनुकूल असल्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अधिक होण्याची शक्यता आहे. सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन आॅफ इंडियाचे (सोपा) कार्यकारी संचालक डी.एन.पाठक यांनी सांगितले आहे की, प्रमुख उत्पादक राज्य मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आणि राजस्थानमध्ये सोयाबीनचे पीक चांगले आले असून, लागवडीत यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. तसेच हवामानाच्या अनुकूलतेमुळे कुठेही पिकाचे नुकसान झालेले नाही. त्यामुळे चालू खरीप हंगामात सोयाबीनचे उत्पादन अधिक होण्याची शक्यता आहे.

कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू खरीप हंगामात सोयाबीनच्या लागवडीत वाढ होऊन, ती १११.९१ लाख हेक्टरवर नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत १०५.२६ लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. मध्यप्रदेशात ५३.१८ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ५०.१० लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. याचप्रमाणे महाराष्ट्रात यावर्षी ३९.२८ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ३८.१८ लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती. याशिवाय राजस्थानात यावर्षी १०.४६ लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड झाली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ९.२४ लाख हेक्टरवर नोंदवली गेली होती.

कृषी मंत्रालयाच्या चौथ्या अनुमानानुसार, २०१७-१८ या पीक वर्षात सोयाबीनच्या उत्पादनात घट होऊन ते १०९.८१ लाख टन इतके नोंदवले गेले. तर त्यामागील वर्षात २०१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादन १३१.५९ लाख टन इतके नोंदवले गेले होते.टॅग्स

संबंधित बातम्या