ऊस, कापसाच्या उत्पादनात वाढ; तर सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता
30 August 08:30

ऊस, कापसाच्या उत्पादनात वाढ; तर सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता


ऊस, कापसाच्या उत्पादनात वाढ; तर सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता

कृषिकिंग, नवी दिल्ली: कृषी मंत्रालयाच्या चौथ्या पीक अनुमानानुसार, २०१७-१८ च्या पीक वर्षात कापसाच्या उत्पादनात वाढ होऊन, ते ३४८.८८ लाख गाठी (१ गाठ-१७० किलो) होण्याची शक्यता आहे. जे मागील २०१६-१७ च्या पीक वर्षात ३२५.७७ लाख गाठी इतके नोंदवले गेले होते. उसाच्या उत्पादनातही यावर्षी वाढ होऊन, ते ३ हजार ७६९ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी (२०१६-१७) ३ हजार ०६० लाख टन इतके नोंदवले गेले होते.

२०१७-१८ च्या पीक वर्षात तेलबियांचे उत्पादन हे मागील वर्षीइतकेच (३१३.०८ लाख टन) नोंदवले जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी (२०१६-१७) तेलबियांचे उत्पादन ३१२.७६ लाख टन इतके नोंदवले गेले होते. मात्र, असे असले तरी सोयाबीनच्या उत्पादनात घट होऊन ते १०९.८१ लाख टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी (२०१६-१७) सोयाबीनचे १३१.५९ लाख इतके उत्पादन झाले होते. रब्बी हंगामातील तेलबियांमध्ये मोहरीच्या उत्पादनात वाढ होऊन, ते ८३.२२ लाख टन इतके होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी (२०१६-१७) मोहरीचे उत्पादन ७९.१७ लाख टन इतके नोंदवले गेले होते. याशिवाय भुईमुगाच्या उत्पादनात वाढ होऊन ते ९१.७९ लाख टन इतके नोंदवले जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी (२०१६-१७) भूईमूगाचे उत्पादन ७४.६२ लाख टन इतके नोंदवले गेले होते.टॅग्स

संबंधित बातम्या