नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; ४ जणांसह १९ जनावरांचा मृत्यू
17 August 17:45

नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; ४ जणांसह १९ जनावरांचा मृत्यू


नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर; ४ जणांसह १९ जनावरांचा मृत्यू

कृषिकिंग, नंदुरबार: नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व धडगाव येथे आज (शुक्रवारी) पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ४ जणांचा मृत्यू झाला आहे, तर आतापर्यंत १९ जनावरांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

नवापूर तालुक्यात १४० मि.मी. तर धडगाव तालुक्यात १०२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. नंदुरबार तालुक्यात ५१ मि.मी.पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात जिल्हा प्रशासनाकडून पाहणी करण्यात आली असून, युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु आहे. तसेच जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे सुरु आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून नंदुरबारमध्ये येत्या २४ तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

नवापूर तालु्क्यात शुक्रवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार उडाला आहे. एका रात्रीतून १४० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. या पावसाने तालु्क्यात आतापर्यंत चार जणांचा बळी घेतला असून, अनेक जण बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. शहरातून वाहणार्‍या रंगावली नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शहरातील जवळपास २०० तर तालुक्यातील २०० घरे वाहून गेले आहेत. तसेच जवळपास ७०० पशुधन आणि ७० वाहने वाहून गेली आहेत. शेकडो घरांमध्ये पाणी शिरुन अनेकांचा संसार उघड्यावर अाला आहे.संबंधित बातम्या