युरियाचे उत्पादन २४४ लाख टन होण्याची शक्यता- कृषी मंत्रालय
17 August 12:45

युरियाचे उत्पादन २४४ लाख टन होण्याची शक्यता- कृषी मंत्रालय


युरियाचे उत्पादन २४४ लाख टन होण्याची शक्यता- कृषी मंत्रालय

कृषिकिंग, नवी दिल्ली: चालू आर्थिक वर्षात (२०१८-१९) युरियाचे उत्पादन १.६ टक्क्यांनी वाढून २४४ लाख टन होण्याची शक्यता आहे. जे मागील वर्षी याच कालावधीत २४०.२ लाख टन इतके नोंदवले गेले होते.

केंद्रीय रसायने आणि खत मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०१७-१८ उत्पादनात थोडी घट झाली होती. काही युनिट्स आपली उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी काम करत होती. चालू आर्थिक वर्षात सर्व युनिट्सकडून युरियाचे उत्पादन सम प्रमाणात झाले आहे. त्यामुळे यावर्षी युरियाचे उत्पादन २४४ लाख टन इतके नोंदवले गेले आहे.

आर्थिक वर्ष २०१७-१८ मध्ये युरियाच्या आयातीत वाढ होऊन, ती ५९.७५ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी (२०१६-१७) याच कालावधीत ५४.८१ लाख टन इतकी नोंदवली गेली होती. तर चालू आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये उत्पादन वाढीमुळे युरियाच्या आयातीत घट होण्याची शक्यता आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्ष (२०१८-१९) पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) युरियाच्या आयातीत वाढ होऊन ती २१.४१ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षीच्या (२०१६-१७) याच कालावधीत १७.०४ लाख टन इतकं नोंदवली गेली होती.

खतांचा संतुलित वापर सुनिश्चित करण्यासाठी आणि युरियाच्या मागणीत कपात करण्यासाठी केंद्र सरकारने देशांतर्गत आणि आयातीत युरियाला नीम कोटेड युरिया करणे, अनिवार्य केले आहे. याशिवाय कंपन्यांना युरियाची बॅग ५० किलो ऐवजी ४५ किलो इतकी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या