केरळात पावसाचा धुमाकूळ सुरूच; मृतांचा आकडा ४५ वर
15 August 14:40

केरळात पावसाचा धुमाकूळ सुरूच; मृतांचा आकडा ४५ वर


केरळात पावसाचा धुमाकूळ सुरूच; मृतांचा आकडा ४५ वर

कृषिकिंग, कोची(केरळ): केरळमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ८ ऑगस्ट पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आतापर्यंत केरळमध्ये ४५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले माहिती आहे. केरळच्या वायनाड, कोझीकोड, कन्नूर, कासरगोड, मलप्पुरम, पलक्कड, इदुक्की व एरनाकुलम या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, मुसळधार पावसामुळे विमानसेवेलाही फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे.

केरळमध्ये गेल्या १५ दिवसांपासून पावसाने थैमान घातल्याने संपूर्ण जीवन कोलमडून गेले आहे. कोचीन विमानतळालगत असलेल्या पेरियार नदीवरील धरण ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर जमा झाले आहे. पावसाचा जोर कमी होत नसल्यामुळे आणि पाण्याचा निसरा न झाल्याने येथील विमानतळ प्रशासनाने शनिवारपर्यंत विमानतळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा आहे.

नद्यांच्या पाणी पातळी मोठी वाढ झाल्याने, केरळमधील सर्वच्या सर्व प्रमुख ३३ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये भूस्खलन होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणचे रस्ते, पूल पाण्याखाली गेले आहेत. अलीकडेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेत, केरळसाठी १०० कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे. तसेच सध्या राज्यातील अनेक भागात १४ एनडीआरएफच्या टीम कार्यरत असून, त्यांना नागरिकांसाठी राहत आणि बचावाचे कार्य करत आहे.संबंधित बातम्या