कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता- आयएमडी
14 August 10:49

कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता- आयएमडी


कोकणासह मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता- आयएमडी

कृषिकिंग, पुणे: पुढील दोन दिवसांमध्ये कोकणात जोरदार, तर मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. तसेच कोकणासह मध्य महाराष्ट्रात कालपासून श्रावणधारा बरसत आहेत.

ओडिशा आणि परिसरावर असलेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावामुळे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे येत्या शुक्रवारपर्यंत (१७ ऑगस्ट) कोकण, विदर्भात, तसेच मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळतील. तर, मराठवाड्यात तुरळक पावसाचा अंदाज आहे. असेही हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता वाढत असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकण्यास सुरवात झाली आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. येत्या बुधवार (१५ ऑगस्ट)पर्यंत केरळ, कर्नाटक, घाटमाथ्यावर पाऊस आणखी वाढणार आहे. मॉन्सूनचा प्रवाह वाढल्याने कोकण, मध्य महाराष्ट्रातही पावसाचा जोर वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने व्यक्त केली. सिंधुदुर्ग, रत्नागिरीमध्ये जोरदार पावसाची शक्‍यता आहे.



संबंधित बातम्या