युरियाच्या देशांतर्गत उत्पादनात घट; आयात वाढली
12 August 14:50

युरियाच्या देशांतर्गत उत्पादनात घट; आयात वाढली


युरियाच्या देशांतर्गत उत्पादनात घट; आयात वाढली

कृषिकिंग, नवी दिल्ली: रासायनिक खतांची आयात कमी करण्यासाठीचा केंद्र सरकारचा प्रयत्न २०१७-१८ यावर्षात युरिया आयातीसाठी लागु झालेला नाही. कारण २०१७-१८ मध्ये युरियाच्या आयातीत वाढ होऊन, ती ५९.७५ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत ५४.५१ लाख टन इतकी नोंदवली गेली होती. याच काळात युरियाचे देशांतर्गत उत्पादन हे २४२.०१ लाख टनांवरून घटून, ते २४०.२३ लाख टन इतके नोंदवले गेले आहे.

देशातील एकूण खतांच्या मागणीत युरियाच्या खपातीचा हिस्सा जवळपास ५० टक्के इतका असून, वार्षिक ३०० लाख टन युरियाची गरज असते. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१७-१८ मध्ये देशभरात एकूण ५९९.७५ लाख टन इतकी खतांची मागणी राहिली आहे. तर खरीप हंगाम २०१८ मध्ये खतांची एकूण आयात ही ३०३.४६ लाख टन इतकी होण्याची शक्यता आहे. यामध्ये १४८.९१ लाख टन युरिया, ४९.१९ लाख टन डीएपी, २०.२६ लाख टन एमओपी, ४९.७४ लाख टन मिश्र खते आणि २६.२६ लाख टन खतांची आयात होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात २०१८-१९ च्या जून महिन्यात युरियाच्या आयातीत वाढ होऊन, ती ७.८६ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. मे महिन्यात युरियाची आयात ही ७.२८ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. तर चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये एप्रिल ते जून याकाळात युरियाच्या आयातीत वाढ होऊन, ती २१.४१ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी २०१६-१७ मध्ये याच कालावधीत १७.०४ लाख टन इतकी नोंदवली गेली होती.

डीएपी खताच्या आयातीत चालू आर्थिक वर्षाच्या जून महिन्यात वाढ होऊन, ती १०.६२ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मे महिन्यात ८.१९ लाख टन इतकी नोंदवली गेली होती. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये अर्थात एप्रिल ते जून या कालावधीत डीएपीच्या आयातीत वाढ होऊन, ती २०.६३ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत २०.६३ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे.संबंधित बातम्या