केंद्र सरकारने औद्योगिक, गैर-कृषी वापरासाठीच्या युरिया आयतीवरील निर्बंध हटवले
30 July 12:22

केंद्र सरकारने औद्योगिक, गैर-कृषी वापरासाठीच्या युरिया आयतीवरील निर्बंध हटवले


केंद्र सरकारने औद्योगिक, गैर-कृषी वापरासाठीच्या युरिया आयतीवरील निर्बंध हटवले

कृषिकिंग, नवी दिल्ली: केंद्र सरकारने औद्योगिक, गैर-कृषी आणि तंत्रज्ञानिक दृष्ट्या वापरल्या जाणाऱ्या युरियाच्या आयतीवरील निर्बंध हटवले आहे. केंद्र सरकारच्या विदेश व्यापार महासंचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अधिसूचनेत याबाबतच्या निर्णयाची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी केवळ राज्य व्यापार महामंडळालाच युरिया आयात करण्याची परवानगी होती. मात्र आता औद्योगिक, गैर-कृषी आणि तंत्रज्ञानिक वापरासाठी थेट वापरकर्ता युरियाची आयात करू शकणार आहे.

दरम्यान, केंद्रीय रसायने आणि खते मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, "२०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाच्या जून महिन्यात युरियाच्या आयातीत वाढ होऊन, ती ७.८६ लाख टन इतकी नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षीच्या जून महिन्यात केवळ ४.०३ लाख टन इतकी नोंदवली गेली होती. तर चालू आर्थिक वर्षाच्या मे महिन्यात ७.२८ लाख टन इतकी युरियाची आयात नोंदवली गेली आहे.

दरम्यान खत मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, २०१८-१९ या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात (एप्रिल ते जून २०१८) २१.४१ लाख टन इतकी युरियाची आयात नोंदवली गेली आहे. जी मागील वर्षीच्या याच कालावधीत (एप्रिल ते जून २०१८) १७.०४ लाख टन इतकी नोंदवली गेली होती. चालू आर्थिक वर्षीच्या युरिया आयातीत ७.६७ लाख टन इतकी सर्वाधिक आयात ही इफको युरियाची झाली आहे.टॅग्स

संबंधित बातम्या