ब्राझीलमध्ये ८५ टक्के गाई या भारतीय प्रजातीच्या; गोवंश परत आणण्यासाठी हरियाणा सरकारचा करार
06 May 11:00

ब्राझीलमध्ये ८५ टक्के गाई या भारतीय प्रजातीच्या; गोवंश परत आणण्यासाठी हरियाणा सरकारचा करार


ब्राझीलमध्ये ८५ टक्के गाई या भारतीय प्रजातीच्या; गोवंश परत आणण्यासाठी हरियाणा सरकारचा करार

कृषिकिंग, चंडीगढ़(हरियाणा): अलीकडेच ब्राझीलच्या उबराबा येथे आयोजित एक्सपो जेबूमध्ये कामधेनु कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या कार्यशाळेचे उद्घाटन ब्राझिलचे राष्ट्रपती मिशेल तेमेर यांच्या हस्ते करण्यात आले. भारताच्या हरियाणा राज्याचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनखड़ हेही या कार्यशाळेला गेले होते. यावेळी त्यांनी ब्राझीलमधील या भारतीय देशी प्रजातींना भारतात परत आणणार असल्याचे म्हटले आहे. यासाठी हरियाणा सरकार व ब्राझिलियन गाय ब्रीडर्स असोसिएशन यांच्यात करार झाला असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

ब्राझीलमध्ये भारतीय गाय ३० लिटरपर्यंत दुध देत असून, या गाई आता आपल्या स्वदेशात येऊन आपल्या पूर्वजांच्या प्रजात वाढीसाठी मदतगार ठरणार आहे. ब्राझीलमध्ये जवळपास १०० वर्षांपूर्वी भारतीय पाठवण्यात आल्या होत्या. जेव्हा या आपल्या कडील गाई त्यांच्या देशात पोहचल्या तेव्हा तेथील लोकांना जाणवले की या गाईंच्या प्रजातीमध्ये विशेष गुण असून, या दुध उत्पादनासाठी एका चांगला सोर्स होऊ शकतात. भारतीय प्रजातीच्या या गाई सध्या जगातील क्रमांक एकाच्या गाई बनल्या आहेत. १८५० पासून भारतीय गीर, लाल सिंधी, कांकरेज, नैलोरी. ओंगले, पुंगानूर, कांगायम या गाईंच्या प्रजाती ब्राझीलमध्ये जाणे सुरु झाले. आणि १९६० पर्यंत हे क्रमशः सुरु राहिले. ब्राझील या देशाने या गाईंच्या प्रजातींवर काम करून त्यांना चांगल्या पद्धतीने विकसित केले आहे. आणि याच गाई भारतात येऊन आपल्या पूर्वजांच्या प्रजात वाढीसाठी मदतगार ठरणार आहे.

ब्राझिलमधील या भारतीय गाई दररोज ७५ लिटर दुध देण्यासाठी विकसित आहे. ब्राझीलची लोकसंख्या २० कोटी असून, ब्राझीलमधील एकूण गोधनाची संख्याही तेवढीच अर्थात त्यांच्या लोकसंख्येइतकीच आहे. विशेष म्हणजे ब्राझीलमधील या २० कोटी गाईंमध्ये १७ कोटी गाई या भारतीय प्रजातीच्या आहे. म्हणजेच ब्राझीलमध्ये ८५ टक्के गाई या भारतीय प्रजातीच्या आहेत. कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आपल्या देशात जवळपास १९ कोटी गोपशु आहेत, त्यापैकी २० टक्के गाई या विदेशी प्रजातींच्या असून, ८० टक्के गाई या देशी आहेत.

हरियाणा राज्याचे कृषिमंत्री ओमप्रकाश धनखड़ यांच्या या भेटीत ‘एबीसीजेड ब्राज़ील’ या ब्राझिलियन गाय ब्रीडर्स असोसिएशनसोबत हरियाणा पशुपालन विभागाचा यासाठी एक करार झाला आहे. ज्याअंतर्गत ब्राझीलमध्ये विकसित भारतीय प्रजातींचा, आपल्या देशातील सध्यस्थितीतील प्रजातींच्या सुधारणेसाठी उत्कृष्टता केंद्र सुरु करण्यासोबत, त्यांचे सीमन, सैक्सड सीमन, जैनेटिक मैटेरियलचा हरियाणामधील गाईंच्या प्रजातींच्या सुधारणेसाठी परत आणण्यासाठीच्या आशयपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये हरियाणा सरकारच्या वतीने कृषी व पशुपालन मंत्री ओमप्रकाश धनखड़ आणि ब्राज़ीलियन गाय ब्रीडर एसोसिएशन के अध्यक्षांच्या वतीने संचालक जैबरियल गरेशिया, रिवालडो मैचाडो, अडवारडो फालकावो यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.संबंधित बातम्या