गाईंच्या दीर्घायुष्यासाठी पोटावर छिद्र पाडताहेत अमेरिकेतील शेतकरी
22 April 11:05

गाईंच्या दीर्घायुष्यासाठी पोटावर छिद्र पाडताहेत अमेरिकेतील शेतकरी


गाईंच्या दीर्घायुष्यासाठी पोटावर छिद्र पाडताहेत अमेरिकेतील शेतकरी

कृषिकिंग, पुणे: अमेरिकेतील गाईंसोबत एक प्रयोग केला जात आहे. हा प्रयोग ऐकून आपण पूर्णतः आश्चर्यचकित व्हाल! अमेरिकेतील शेतकरी सेंद्रिय दुग्धव्यवसायाचा प्रयोग करत असून, यामध्ये त्यांनी गाईच्या पोटावर एक छिद्र पाडले आहे. हे छिद्र प्रामुख्याने गाईचे आयुष्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

वैज्ञानिकांनी याबाबत माहिती दिली आहे की, गाईच्या शरीराची आंतररचना समजून घेणे खुप अवघड आहे. त्यामुळे गाईच्या शरीरावर एक छिद्र पाडण्यात आले आहे. या छीद्र्याला प्लॅस्टिकच्या रिंगने बंद केले जाते. ऑपरेशन झाल्यानंतर एका महिन्याच्या आता गाय पूर्णतः ठीक होते. पोटावर करण्यात आलेल्या या छीद्र्याचा वापर हा गाईच्या पचनक्रियेबद्दल माहिती मिळवण्यासाठी केला जातो. गाय कोणत्या पद्धतीचा चारा चांगल्या प्रकारे पचन करू शकते, आणि कोणता चारा पचन करण्यात तिला अडचण निर्माण होते. याबाबतची सर्व माहिती या प्रक्रीयेद्वारे समजून घेतली जाऊ शकते. याशिवाय गाईच्या पोटात असणाऱ्या जीवाणूंचीही याद्वारे सहज माहिती मिळू शकते. हा फिस्टुला अर्थात छीद्र्याद्वारे पोटातील बाबींचा अभ्यास करण्याचा मार्ग गाईच्या शरीरावर ज्या ठिकाणी सुरु होतो. त्याला रुमेन असे म्हणतात.

गाईने चारा खाल्ल्यानंतर या फिस्टुलाचा वापर करून समजून घेतले जाते की, तिच्या पोटात चारा पचनाची प्रक्रिया कोणत्या पद्धतीने होत आहे. विशेष म्हणजे गाय ही संपूर्ण प्रक्रिया करताना थोडीही हालचाल करत नाही. हे प्रयोगासाठी खूप फायदेशीर आहे. तेथील वैज्ञानिकांकडून सांगितले जात आहे की, या संपूर्ण प्रक्रियेमुळे गाईच्या आयुमर्यादेत वाढ होते. आजारी असतानाच्या स्थितीत तिला औषधोपचार हा पूर्णतः याच मार्गाने दिला जाऊ शकतो. गाईंच्या पोटात उपलब्ध असलेल्या माइक्रोब्सचे परीक्षण केल्यानंतर त्याला दुसऱ्या जनावरांमध्येही प्रस्थापित केले जाऊ शकते.

दरम्यान, हा प्रयोग खूप फायदेशीर असला तरी या संपूर्ण प्रक्रियेवर बरेच लोक टीकाही करत आहेत. मात्र, गाईच्या शरीराचा एक भाग काढून, तिच्या पोटातील संवेदनशील भाग उघड करण्याची आणि त्यातून आंतररचनेची माहिती मिळवण्याची ही प्रक्रिया गेल्या काही काळापासून प्रचलित आहे. अनेक लोक मानतात की, या ऑपरेशनमुळे गाईच्या शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. परंतु, ऑपरेशन झाल्यानंतर ४ ते ५ आठवडे गाय ही अस्वस्थ झालेली असते.

या प्रक्रियेवर टीका करणारे या पद्धतीला केवळ मांस आणि दुग्धव्यवसाय कंपन्याच्यां फायद्यासाठीच्याच दृष्टीने पाहतात. याउलट या प्रक्रियेकडे गेल्या काही काळापासून शाश्वत शेतीसाठीची पद्धत म्हणून पहिले जात आहे. टीकाकारांचे हेही म्हणणे आहे की, अमेरिकेत सध्यस्थितीत ‘फेडरल अॅनिमल वेलफ़ेयर एक्ट’ हा एकमात्र असा कायदा आहे. जो अशा पद्धतीच्या प्रयोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या जनावरांच्या अधिकारांसाठी तयार करण्यात आला आहे. परंतु, गाईसारखे प्राणी जे शेतीच्या कामामध्ये अत्यंत उपयोगशील ठरतात. त्यांना हा कायदा लागू होत नाही. याचा अर्थ स्पष्ट आहे की, या फिस्टुलेटेड गाईंना क्रूरतेचा सामना करण्यासाठी अमेरिकेत कोणतेही कायदेशीर संरक्षण नाही.संबंधित बातम्या