युरियाची गोणी आता ४५ किलोची; २६६ रुपये किंमत
31 March 12:50

युरियाची गोणी आता ४५ किलोची; २६६ रुपये किंमत


युरियाची गोणी आता ४५ किलोची; २६६ रुपये किंमत

कृषिकिंग, नवी दिल्ली: युरियाचा वाढता वापर टाळण्याबरोबरच टंचाई कमी करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने आता युरियाचे गोणीतील प्रमाण घटविण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून ५० किलोच्या गोणीऐवजी ४५ किलोची गोणी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. प्रत्येक गोणीमागे पाच किलो युरियाची बचत यामुळे होणार आहे.

गेल्या दोन महिन्यांपासूनच गोणीचे वजन कमी करण्याची चर्चा सुरू होती. याबाबतच्या सूचना सरकारकडून कंपन्यांना दिल्या गेल्या होत्या. यानुसार कंपन्यांनी पॅकिंगमध्ये बदल करत नव्याने ४५ किलोच्या गोणीची निर्मिती केली आहे. नव्या पॅकिंगची गोणी विक्रेत्यांकडेही दाखल झाली आहे. सध्या ५० किलोच्या युरिया गोणीची किंमत २९५ रुपये इतकी आहे, जी आता ४५ किलोच्या गोणीसाठी २६६ रुपये इतकी असणार आहे.

तर दोन महिन्यांत कंपन्यांनी यापूर्वी तयार केलेल्या ५० किलोच्या गोण्यांची विक्री करावी. यानंतर सरसकटच ४५ किलोच्या गोणीतूनच विक्री करावी, अशा सूचना खत विक्रेत्यांना सरकारकडून देण्यात आल्या आहेत.टॅग्स

संबंधित बातम्या