लवकरच ३५० रुपयांचे नाणे बाजारात येणार
28 March 14:49

लवकरच ३५० रुपयांचे नाणे बाजारात येणार


लवकरच ३५० रुपयांचे नाणे बाजारात येणार

कृषिकिंग, मुंबई: भारतीय रिझर्व बँक लवकरच ३५० रुपयांचे नाणे जारी करणार आहे. शिखांचे दहावे गुरु 'श्री गुरु गोविंद सिंह' यांच्या ३५० व्या प्रकाशोत्सवाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांसाठी आरबीआय ही नाणी बाजारात आणणार आहे. ही नाणे फारच कमी कालावधीसाठी जारी केली जाणार आहेत. आरबीआयकडून अशाप्रकारची नाणी खास निमित्तासाठी जारी केली जातात.

चांदी, तांबे, निकेल आणि झिंक धातूमिश्रित ३५० रुपयांचे हे नाणे ४४ एमएमचे असेल. नाण्याच्या पुढच्या भागात अशोकस्तंभ त्याखाली सत्यमेव जयते लिहिलेले असेल. त्याचबरोबर नाण्याच्या दोन्ही बाजूंना इंग्लिशमध्ये इंडिया आणि देवनागरीत भारत लिहिलेले असेल. याच भागात रुपयाचे चिन्ह आणि मध्ये ३५० मुद्रीत केले असेल. तर नाण्याच्या मागील भागावर इंग्लिश आणि देवनागरीत श्री गुरु गोविंद सिंह यांचा ‘३५० वा प्रकाश उत्सव’ असे लिहिलेले असेल. यावर १६६६-२०१६ हे देखील मुद्रीत केलेले असेल. असे रिझर्व बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे.संबंधित बातम्या