भारतीय शेतकरी ऑस्ट्रेलियात शेती करून होतायेत मालामाल...!
17 March 11:05

भारतीय शेतकरी ऑस्ट्रेलियात शेती करून होतायेत मालामाल...!


भारतीय शेतकरी ऑस्ट्रेलियात शेती करून होतायेत मालामाल...!

कृषिकिंग, पुणे: भारतात शेतकरी आंदोलन पुन्हा एकदा भडकले आहे. गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रातील ४० हजार शेतकऱ्यांनी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या सत्ता केंद्राला धडक देऊन आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय तो या शेतकऱ्यांना कोण त्यांचा अधिकार मिळवून देईल. शेतकरी संघटनाचे म्हणणे आहे की त्यांचावर पहिल्यापासून धोकेबाजी होत आहे. त्यामुळे भारतात शेतकरी होणे हा आता एक अभिशाप मानला जातोय...

मात्र याउलट एक कथा अजूनही आहे. ती म्हणजे भारतातील शहरी भागातील लोक आपल्या जमिनीचा छोटासा तुकडा विकून विदेशात शेकडो एकर जमिनीवर शेती करत आहेत. ही कथा पंजाबच्या शेतकऱ्यांची आहे. हे लोक पंजाबमधील आपले छोटे–छोटे प्लॉट विकून ऑस्ट्रेलियात लैंडलॉर्ड बनले आहेत. त्यांच्या शेतात आता छोटे-मोठे ट्रक्टर नाही तर सॅटेलाइट माध्यमातून चालणारी यंत्रे काम करत आहेत. कीटकनाशकांची फवारणी ही सुद्धा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने केली जात आहे. तुमच्याकडेही या पद्धतीने रक्कम उभी राहत असेल आणि तुम्हीही जमीन खरेदीसाठी गुंतवणूक करणार असाल तर ऑस्‍ट्रेलियाची शेती तुमची वाट पाहत आहे...

ऑस्‍ट्रेलिया भारतापेक्षा क्षेत्रफळाने जवळपास अडीच पटीने मोठा आहे. तर ऑस्‍ट्रेलियाची लोकसंख्या ही भारताच्या लोकसंख्येच्या ७ टक्के एवढीच आहे. ऑस्‍ट्रेलियातील जवळपास ८० टक्के शेतजमीन ही सध्या कोणत्याही वापरात नाहीये. आणि तिथे शेती करण्यासाठी शेतकऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत ऑस्‍ट्रेलियाची सरकारही एवढ्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या जमिनीचा शेतीसाठी वापर करण्यास इच्छुक आहे. तेथील सरकार विदेशी शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देत असून, आपल्या आधिपत्याखालील विदेशी शेतकऱ्यांना प्रत्येक सुविधा उपलब्ध करून देत आहे.

ऑस्ट्रेलिया सरकारच्या या नीतीविषयी समजून आतापासून जवळपास ७ वर्षांपूर्वी पंजाबच्या शेतकऱ्यांनी तिकडे जाणे सुरु केले होते. सर्वात पहिल्यांदा चंडीगड येथील पुनीत भल्ला यांनी आपला चंडीगड शहरातील एक प्‍लॉट आणि गावाकडची काही जमीन २.५ कोटी रुपयांना विकली. आणि त्यांनी ऑस्ट्रेलियातील किंगलेक परिसरात ४०० एकर जमीन खरेदी करून शेती करणे सुरु केले. यांनतर त्यांनी तिथे आणखी गुंतवणूक करत सध्या त्यांच्याकडे जवळपास १२०० एकर शेती आहे. तेव्हापासून आतापर्यंत पंजाब आणि हरियाणातील जवळपास १४ हजार शेतकऱ्यांनी ऑस्ट्रेलियात शेतजमीन खरेदी केली आहे. दक्षिण ऑस्‍ट्रेलिया परिसरात भारतीय शेतकऱ्यांचा ‘सिंह डॉट’ नावाचा समूह स्थापन झाला आहे. ज्यामध्ये हजारो सदस्य सामील आहेत.

ऑस्ट्रेलियन सरकार जमिनीची उपलब्धता जास्त असल्यामुळे जमीन विदेशी शेतकऱ्यांना विक्री करत आहे. या जमिनीला आतापर्यंत कधीही शेतीसाठी वापरण्यात आले नाही. परंतु ही खूप सुपीक जमीन मानली जात आहे. पुनीत भल्ला आणि अन्य शेतकऱ्यांनी तिथे फक्त ३५ हजार एकर दराने जमीन खरेदी करणे सुरु केले होते. तिकडेही सध्या जमिनीचे दर वाढले आहे. मात्र, भारताच्या तुलनेत ते दर खूपच कमी आहे. भारतात सध्या खडकाळ जमिनीचे दर हे प्रति एकर १० लाखाच्या आसपास आहेत. तर ऑस्ट्रेलियात क्विन्‍सलैंड परिसरात १ ते १.५ लाख प्रति एकर दरात जमीन विक्री केली जात आहे. ऑस्ट्रेलियात जमीन तुम्ही खरेदी करू शकता, त्यात कायमस्वरूपी बांधकाम करू शकतात. मोजांबिक आणि कॅनडा या आणि इतर देशामध्ये मात्र जमीन ही कंत्राटी पद्धतीने केली जाते.संबंधित बातम्या